भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांची टी20 खेळवली जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्माने कमबॅक केला आहे.

तब्बल 14 महिन्यांनंतर रोहित टी20 क्रिकेट खेळणार आहे, इतकंच नाही तर त्याच्याकडे टी20 संघाचं कर्णधारपदही सोपवण्यात आलं आहे.

या टी20 मालिकेत रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी आहे. तीन विक्रम तो आपल्या नावावर करु शकतो.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत रोहितने 18 षटकार लगावल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरेल

अफगाणिस्तानविरुद्धची मालिका 3-0 अशी जिंकल्यास रोहित शर्मा भारताच्या टी20 क्रिकेटच्या इतिहातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरेल.

अफगाणिस्तानविरुद्ध रोहितने मालिकेत 155 धावा केल्यास टी20 सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो विराट कोहलीला मागे टाकेल.

रोहित शर्माने 148 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3853 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये 4008 धावा आहेत.

VIEW ALL

Read Next Story