टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रविड यांचा आज वाढदिवस आहे. 11 जानेवारी 1973 रोजी इंदूरमध्ये राहुल द्रविडचा जन्म झाला.
क्रिकेट विश्वात 'द वॉल' म्हटल्या जाणाऱ्या राहुल द्रविड यांना अजून एक टोपणनाव आहे.
द्रविडला क्रिकेटचा जंटलमन असं जरी म्हटले जात असले, तरी त्याला जॅमी या नावानेही ओळखले जाते.
राहुल द्रविडला जॅमी असं का म्हटलं जातं? मुळात वडील शरद द्रविड यांच्या नोकरीमुळे त्याला हे टोपणनाव पडलं आहे.
वडिल शदर द्रविड हे जॅम बनवणाऱ्या किसान प्रोडक्ट कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यामुळे राहुल जेव्हा खेळाला जायचा, तेव्हा आई त्याच्या बॅगेत जॅमची बॉटल द्यायची.
इतकंच नाही तर किसान जॅमची जाहिरातीत देखील राहुलने काम केलं होतं. त्यानंतर कर्नाटक टीमतील खेळाडूंनी विशेषत: जवागल श्रीनाथने त्याला जॅमी म्हणायला सुरुवात केली.