भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तीने पुन्हा एकदा शमीवर निशाणा साधलाय.

पण यावेळी हसीन जहाँने मोहम्मद शमीवर बोचरी टीका केली आहे. यासाठी तीने रोहित शर्माच्या फोटोचा आधार घेतला आहे.

हसीन जहाँने रोहित शर्माचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात रोहित शर्मा आपल्या मुलीच्या मांडावर डोकं ठेऊन बसला आहे.

हा फोटो शेअर करत हसीन जहाँने एक कमेंट केली आहे. मुलीच्या कुशीत पित्याला आनंद मिळतो. पण काही पित्यांना वेश्यांच्या कुशीत सुख मिळतं.

हसीनने पुझढे लिहिलंय, अल्लाह असे चरित्रहिन वडिल कोणत्याच मुलीला देऊ नको, आमीन...

याआधीही हसीन जहाँने एका रेड्याचा फोटो शेअर करत अमरोहा का भैंसा असं कॅप्शन दिलं होतं. शमी उत्तरप्रदेशमधल्या अमरोहा इथला आहे.

मोहम्मद शमीला नुकताच अर्जुन पुरस्कार मिळालाय. दुखापतीमुळे तो सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो खेळत नाहीए

VIEW ALL

Read Next Story