WhatsApp वापरण्यात हा देश नंबर वन! भारताने नाही तर 'या' देशाने मारली बाजी

सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप

व्हॉट्सअप हे सध्या जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं इन्सटंट मेसेजिंग अ‍ॅप आहे.

सर्वाधिक प्रमाणात व्हॉट्सअप वापराणारा देश कोणता

आज आपल्यापैकी अनेकजण न चुकता दररोज अनेकदा हे अ‍ॅप वापरत असणार. मात्र जगात सर्वाधिक प्रमाणात व्हॉट्सअप वापराणारा देश कोणता हे ठाऊक आहे का?

रोज व्हॉट्सअप वापरणारे देश

जगातील कोणत्या देशातील किती लोक सक्रीयपणे म्हणजेच अ‍ॅक्टीव्ह युझर्स म्हणून रोज व्हॉट्सअप वापरतात हे जाणून घेऊयात...

अमेरिका तुलनेनं मागे

अमेरिका व्हॉट्सअपच्या वापराबद्दल तुलनेनं फार मागे आहे. अमेरिकेतील 31 टक्के लोक नियमितपणे व्हॉट्सअप वापरतात.

फ्रान्सही या यादीत

फ्रान्समधील 66 टक्के लोक रोज व्हॉट्सअप वापरतात.

युकेचाही यादीत समावेश

युनायटेड किंग्डमधील 77 टक्के रोज नियमितपणे व्हॉट्सअपचा वापर करतात.

यादीत जर्मनीचाही समावेश

जर्मनीतील 87 टक्के लोक दररोज व्हॉट्सअप पाहतात.

भारत कितव्या स्थानी?

भारत हा व्हॉट्सअपच्या सर्वाधिक वापराचा विचार केल्यास चौथ्या क्रमांकावर आहे.

भारतात व्हॉट्सअप वापरणारे किती लोक?

भारतातील 90 टक्के लोक रोज व्हॉट्सअप वापरतात.

तिसऱ्या स्थानी हा देश

सर्वाधिक व्हॉट्सअप वापरणाऱ्या युझर्सच्या यादीत मॅक्सिको देश तिसऱ्या स्थानी आहे. येथील 92 टक्के लोक नियमितपणे व्हॉट्सअप वापरतात.

दुसऱ्या स्थानी कोणता देश?

ब्राझील हा व्हॉट्सअप वापरणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असून येथील 93 टक्के लोक रोज व्हॉट्सअप वापरतात.

पहिल्या क्रमांकावर कोणता देश?

दक्षिण आफ्रिका हा व्हॉट्सअपचा सर्वाधिक वापर करणारा देश आहे. येथील 96 टक्के लोक नियमितपणे व्हॉट्सअप वापरतात.

ही पाहा संपूर्ण यादी

ही पाहा व्हॉट्सअपचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांची संपूर्ण यादी...

VIEW ALL

Read Next Story