आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर खेळाडूला संधी देण्यात आली आहे. डॅनिअल मॅकगेही (Danielle Mcgahey) असं या खेळाडूचं नाव आहे.

Sep 01,2023


आयसीसीने या मंजूरी दिली आहे. डॅनिअलने पुरुष ते महिला अशी लिंगबदलाची शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे. आता आंतराष्ट्रीय सामना खेळणारी डॅनिअल पहिली ट्रान्सजेंडर असेल


29 वर्षांची डॅनिअर मूळची ऑस्ट्रेलियाची आहे. 2020 मध्ये ती कॅनडात आली इथच स्थायिक झाली. 2020 मध्ये डॅनिअलने लिंग बदल शस्त्रक्रिया केली.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली ट्रान्सजेंडर म्हणून खेळण्याची संधी मिळणार असल्याचा आपल्याला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया डॅनिअलने दिली आहे.


डॅनिअल आता कॅनडाच्या राष्ट्रीय संघातून खेळणार आहे. याआधी डॅनिअल दक्षिम अमेरिकेतील महिला चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळली होती. चार सामन्यांची मालिका कॅनडाने जिंकली होती. पण या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जा नव्हता.


आता अमेरिका क्वालीफायर सामने होणार असून 4 ते 11 सप्टेंबर दरम्यान लॉस एंजिल्स इथं ही प्रक्रिया होणार आहे. या स्पर्धेत अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा आणि यजमान अमेरिया या संघांचा समावेश आहे.


क्वालिफायर राऊंडमध्ये विजेता संघ बांगलादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या महिला टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story