नद्या, समुद्राच्या प्रवाहाची दिशा बदलेल. समुद्राच्या लाटा उलट्या फिरतील.
दिवसाच्या वेळी रात्र असेल आणि रात्रीच्या वेळी दिवस असेल.
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात बदल होईल.
दिशा बदलल्यामुळे हवामानात तीव्र बदल दिसून येतील.
वारे उलट्या दिशेने वाहतील. वाऱ्याच्या बदलामुळे तापमानात बदल होईल. मान्सून प्रभावित होईल.
अनेक झाडे आणि वनस्पतीही नामशेष होतील. मनुष्यावर याचा फार गंभीर परिणमा होईल.
पूर्व युरोप आणि उत्तर चीनमध्ये थंडीची लाट येईल.
उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील जंगलांची जागा वाळवंट घेतील.
सहारा आणि मध्य पूर्व वाळवंटी भागात हिरवळ पसरेल.
पृथ्वी स्वत: भोवती पश्चिमेकडून पूर्वेला फिरत असते. यामुळेच पूर्व दिशेला सूर्योदय तर पश्चिमेला सूर्यास्त होतो.