भारतात या वर्षाच्या अखेरीस आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
आयसीसीने एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओबरोबर आयसीसीने मिशन वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात केली आहे.
आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओला बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा आवाज देण्यात आला आहे. शिवाय तो स्वत:ही या जाहीरातीत दिसतोय.
आयसीसीने स्पर्धेच्या तब्बल 77 दिवस आधी हा व्हिडिओ लॉन्च केला आहे. भारतात 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
व्हिडिओत दिग्गज क्रिकेटर मुथैया मुरलीधरन, जेपी ड्युमिनी, दिनेश कार्तिक, ओएन मॉर्गेन आणि शुभमन गिल यांचाही समावेश आहे.
आयसीसीने शाहरुख खानचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यात शाहरुखच्या हाती वर्ल्ड कप ट्रॉफी दाखवण्यात आली आहे.
या व्हिडिओत खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावरे विविध भाव दाखवण्यात आले आहेत.
भारतात हैदराबाद, अहमदबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरु, मुंबई आणि कोलकातात वर्ल्ड कपचे सामने खेळवले जाणार आहेत.
भारतीय संघाने 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वन डे वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. पण 2013 पासून टीम इंडियाने आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही.