एशियन स्पर्धेत क्रिकेट प्रकार टीम इंडियाने गोल्ड मेडल पटकावलं. अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा पराभव केला.
यादरम्यान चीनमध्ये राहाणाऱ्या एका क्रिकेट फॅनची कहाणी व्हायरल झाली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मंधानाचा हा जबरा फॅन आहे.
महिला संघाची स्टार फलंदाजी स्मृती मंधानाची एक झलक पाहाण्यासाठी या पठ्ठ्याने चक्क 1300 किलोमीटरचा प्रवास केला.
स्मृती मंधानासाठी त्याने एक पोस्टर आणलं होतं, त्यावर लिहिलं होतं, 'स्मृती मंधाना: देवी', हे पोस्टर त्याने भर मैदानात झळकावलं
स्मृती मंधानाला पाहण्यासाठी त्याने 11,400 रुपये खर्च केले. बिजिंग ते हांगझाऊ हे अंतर 1300 किलोमीटर इतकं आहे.
या क्रिकेट फॅनचं नाव जून यू असं आहे. स्मृती मंधानाशिवाय सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे त्याचे फेव्हरेट क्रिकेटर्स आहेत. जून यूच्या मते सध्याच्या युगात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे महान क्रिकेटपटू आहेत.
चीनमध्ये राहाणाऱ्या जून यूला युट्यूब व्हिडिओ पाहून क्रिकेट आवडायला लागलं. बिजिंग युनिव्हर्सिटीतून तो क्रिकेट खेळतो.