गणपतीचे विसर्जन पाण्यातच का केले जाते?
अनंत चतुर्दशीला म्हणजे पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला गणेशजींचं विसर्जन होतं.
28 सप्टेंबर गुरुवारी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. 10 दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला होणार आहे.
पण तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का, बाप्पाला पाण्यातच का विसर्जित केलं जाते?
तर पौराणिक कथेनुसार, वेद व्यासजी गौरीपुत्र गणेशाला कथा सांगत आणि बाप्पा ते लिहून ठेवायचे. एकदा कथा सांगता सांगता वेद व्यासजींनी डोळे मिटले आणि ते 10 दिवस कथा सांगत राहिले. सलग 10 दिवस बाप्पा कथा लिहत राहिले.
10 दिवसांनी वेद व्यासजींनी आपले डोळे उघडले आणि पाहिलं तर बाप्पाच्या शरीराचे तापमान अतिशय वाढले होते. आता काय करायचं या विचारत असताना...
त्यांनी बाप्पाचं शरीर थंड करण्यासाठी पाण्यात बुडवलं. त्यामुळे बाप्पाचं शरीर थंड झालं. तेव्हापासून 10 दिवसांननी बाप्पाचं थंड पाण्यात विसर्जन केलं जातं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)