एशियन गेम्स 2023 मध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळालं. 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात तीन नेमबाजांनी सुवर्ण कामगिरी केली.

भारताच्या या सुवर्ण कामगिरीत दिव्यांश पंवारचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. भारतीय संघाने 1893.7 पॉईंट मिळवत पहिलं स्थान पटकावलं

दिव्यांश पंवारचं हे यश खूप खास आहे. त्याचं कुटुंब त्याच्यावर प्रचंड नाराज होतं. दिव्यांशला PUBG खेळाचं व्यसन जडलं होतं.

दिवसरात्र दिव्यांश मोबाईलवर पबजी गेम खेळत असे. यामुळे त्याचे वडील त्याच्यावर प्रचंड संताप करत होते.

मुलाचं हे व्यसन सुटावं म्हणून 2017 मध्ये त्याच्या वडीलांना दिव्यांशला दिल्लीतल्या कर्णीसिंह शुटिंग रेंजमध्ये प्रवेश घेऊन दिला.

यानंतर दिव्यांशमध्ये आश्चर्यकारक बदल झाला. 2019 मध्ये त्याने ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी केली. 2018 मध्य त्याने ज्युनइर वर्ल्ड कपचं गोल्ड मेडल जिंकलं.

2019 मध्ये दिव्यांशने बिजिंग 10 मीटर एर रायफल प्रकारात रौप्य पदक पटकावलं. आणि आता एशियन गेम्समध्ये त्याने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.

VIEW ALL

Read Next Story