Asia Cup 2023 : देश बाहेर पडला, पण शोएब अख्तरचं दुःखच वेगळं! व्हिडीओ होतोय व्हायरल

आशिया कपच्या सुपर 4 मध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 2 विकेट्स राखून पराभव केला. या पराभवासह पाकिस्तानचा संघ आशिया कपमधूनही बाहेर पडलाय.

एशिया कपमध्ये आता अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.

या रोमांचक सामन्यात पाकिस्तानच्या पराभवानंतर, पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तर दु:खी झाला आहे.

दरम्यान शोएबला दुःख होण्याचं कारण पाकिस्तानचा पराभव नव्हे तर काहीतरी वेगळंच असल्याचं समोर आलं आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना शोएब म्हणाला की, भारत-पाकिस्तानचा अंतिम सामना कधीच होऊ शकत नाही, असं मला वाटतं.

अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितलं की, या पराभवाने मला वाईट वाटलंय. पाकिस्तानने आशिया कपचा अंतिम सामना खेळायला हवा होता.

भारत आणि श्रीलंका यांच्यात 17 सप्टेंबर रोजी सामना होणार आहे. हा अंतिम सामनाही कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

VIEW ALL

Read Next Story