आज आशिया चषक 2023 स्पर्धेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोलहीने पहिल्यांदाच एकत्र फलंदाजी केली.
या दोघांना आज एकत्र खेळताना केवळ 10 धावांची पार्टनरशीप करता आली. तरी या 10 धावा करुनही या दोघांनी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
विराट आणि रोहित दोघांनी एकत्र फलंदाजी करताना 5000 हजारहून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
विराट आणि रोहितने एकूण 86 डावांमध्ये एकत्र खेळत भारतासाठी 5008 धावा केल्या आहेत.
रोहित आणि विराटची जोडी पार्टनरशीपमध्ये 5 हजार धावांचा पल्ला गाठणारी तिसरी भारतीय जोडी ठरली आहे.
यापूर्वी भारताकडून पर्टनरशीप करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या जोड्यांमध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली तसेच रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचा समावेश आहे.
सर्वात कमी डावांमध्ये आपल्या देशासाठी 5 हजार धावांची पार्टनरशीप करण्याचा विक्रम विराट आणि रोहितने आपल्या नावे करुन घेतला आहे. हे यापूर्वी कोणालाही जमलेलं नाही.
विराट आणि रोहित आधी हा विक्रम वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज गार्डन ग्रिंडी आणि डेस्मंड हॅनिस यांच्या नावे होता. त्यांनी 97 खेळींमध्ये हा विक्रम आपल्या नावावर केलेला.