एशिया कप स्पर्धेची फायनल रविवारी म्हणजे 17 सप्टेंबरला खेळवली जाणार आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता अंतिम सामना सुरु होईल
अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका संघ आमने सामने असणार आहेत. भारताने पाकिस्तान-श्रीलंकेवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली तर श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.
आता एशिया कपवर कोण नाव कोरणार हे काही तासाच स्पष्ट होईल. या स्पर्धेतील विजेत्या संघावर करोडो रुपयांची बरसात होणार आहे तर उपविजेता संघही मालामाल होईल
रिपोर्टनुसार एशिया कप स्पर्धेसाठी एकूण 3.4 कोटी रुपयांची प्राईज मनी निश्चित करण्यात आली आहे.
एशिया कप विजेत्या संघाला 1.65 कोटरी रुपये बक्षीस मिळेल. तर उपविजेत्या संघाला 82 लाख रुपये दिले जातील.
सुपर-4 मध्ये नंबर तीनवर असणाऱ्या संघाला 51 लाख रुपये मिळतील. तर चौथ्या क्रमांकावरच्या संघाला 25 लाख रुपयांच इनाम दिलं जाईल.
गत एशिया कप विजेत्या संघाला 1.50 कोटी रुपयांचे बक्षीस मिळालं होतं. यावेळी बक्षीसाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.