आवडत्या सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स इच्छुक असता.
काही सेलिब्रिटीजनी सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केल्यावर आपलं नाव बदललं तर काही आपल्या नावापुढे आडनाव लावत नाहीत.
तेव्हा तुम्हाला मराठीतील 7 अशा सेलिब्रिटींची आडनाव सांगणार आहोत जे स्वतःच्या नावापुढे आडनाव लावत नाहीत.
अमृता सुभाष ही मराठी आणि बॉलिवूड चित्रपटातील गाजलेली अभिनेत्री असून तीच पूर्ण नाव 'अमृता सुभाष कुलकर्णी' असं आहे. अमृताचं आडनाव 'कुलकर्णी' असं आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील हिचं खरं आडनाव हे 'धाबडगावकर' असं आहे.
'मैने प्यार किया' या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री हीच खरं आडनाव 'पटवर्धन' असं आहे. भाग्यश्रीचं लग्नानंतरचं आडनाव भाग्यश्री दासानी असं आहे.
'काही दिया परदेस' आणि 'गोष्ट एका पैठणीची' यामधून आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री सायली संजीव हिचं खरं आडनाव हे 'चांदसारकर' असं आहे.
मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकर हा सुद्धा प्रोफेशनल लाईफमध्ये त्याचं आडनाव लावत नाही. मात्र ललितचं खरं आडनाव हे 'भदाणे' असं आहे.
तेजस्वी प्रकाश हिने मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये काम केलं असून तिचं संपूर्ण नाव हे तेजस्वी प्रकाश वायंगणकर असं आहे.
संगीतकार आणि गीतकार अजय अतुल या दोघाभावांच्या जोडीने प्रेक्षकांना त्यांच्या संगीताने वेड लावलं. त्यांचं आडनाव हे अतुल गोगावले.