धणत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीसोबत कुबेर देव आणि भगवान धन्वंतरीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी घरात पूजा केल्याने सुख, सौभाग्य आणि समृद्धीचा वास राहतो. या दिवशी वस्तू खरेदी केल्याने विशेष लाभ होतो.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, वाहनन, घर-जमीन, लक्ष्मी-गणेशची मूर्ती किंवा भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. यासोबतच झाडूची देखील खरेदी या दिवशी करतात.
धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. याबाबत विस्तृत जाणून घेऊया.
झाडूला लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते. अशावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे घरी ऐश्वर्य, संपत्तीचा वास राहतो.
जर तुम्हालाही वाटत असेल की, लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहावी तर धनत्रयोदशीला झाडू खरेदी करा. यामुळे आर्थिक स्थिती अतिशय मजबूत होईल.
धनत्रयोदशीच्या दिवशी फूलझाडू आणि साधी झाडू खरेदी करुन हा दिवस अतिशय शुभ आणि फलदायी दिवस साजरा करा.