महाभारतानुसार अर्जुनला 4 पत्नी होत्या. स्वयंवर जिंकून त्यांचा द्रौपदीशी विवाह झाला होता.
महाभारतातील उल्लेखानुसार द्रौपदी ही अर्जुनसह पांडवांची पत्नी होती.
त्यानंतर व्दारकेतील वास्तवादरम्यान अर्जुन श्रीकृष्णाच्या बहिण सुभद्राला पाहून मोहित झाला आणि श्रीकृष्णाच्या संमतीने सुभद्राचे अपहरण केले.
एक दिवस युधिष्ठर द्रौपदीसोबत असताना अर्जुनाला धनुष्य घेण्यासाठी द्रौपदीच्या शयनगृहात जावे लागले.
हे नियमांचे उल्लंघन केल्याचे अर्जुनाला वाटले. युधिष्ठराने नकार दिल्यानंतरही अर्जुन वनवासात निघून गेला.
त्याचकाळात अर्जुनने प्रथम नागकन्या उलुपी आणि नंतर मणिपूरची राजकन्या चित्रगंदा सोबत विवाह केला.
याविवाहासाठी यादवांची संमती घेण्यात अर्जुन यशस्वी झाला. काही दिवस सुभद्रा द्वारकेत राहिली आणि नंतर अर्जुनाचा वनवास पूर्ण झाल्यावर ते इंद्रप्रस्थेला आले.
कालक्रमानुसार अर्जुनची पहिली पत्नी द्रौपदी आहे.