अठरा दिवस चाललेल्या महाभारताच्या युद्धात धर्माची रक्षा आणि अधर्माचा विनाश जरूर झाला मात्र या धर्म स्थापनेची किंमत श्रीकृष्णाला मोजावी लागली.
महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्ण जेव्हा कौरवांची माता गांधारीला भेटला तेव्हा क्रोधात तिने श्रीकृष्णाला शाप दिला.
गांधारीने शाप दिला की जसा कुरूक्षेत्रात कुरूवंशाचा नाश झाला तसा श्रीकृष्णाच्या यदुवंशाचादेखील नाश होईल.
शापाच्या प्रभावाने हळूहळू द्वारकेत धर्माचा नाश होऊ लागला. श्रीकृष्णाच्या पुत्राला शाप मिळाला त्यातून त्याने मुसळ उत्पन्न केला जो संपूर्ण यदुवंशाच्या नाशाच कारण ठरणार होता.
राजा उग्रसेनने मुसळ दळून समुद्रात फेकून दिलं.परंतु तरीही या शापातून द्वारका वाचली नाही.सात्यकी आणि कृतवर्मात झालेल्या भांडणात कृतवर्माचा मृत्यू झाला.
हळूहळू श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युमन सोबत यदुवंशाचा नाश झाला. हे पाहून बलरामाला अत्यंत दु:ख झाले आणि त्यांनी जलसमाधी घेतली.
बलरामाच्या जाण्यानंतर श्रीकृष्ण जंगलाच्या दिशेने निघून गेले. तिथे बहेलियाने मारलेल्या बाणामुळे श्रीकृष्णाने धरती लोकाचा त्याग केला.
दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णाच्या पत्नींनी आत्मदहन केलं आणि अशाप्रकारे यदुवंशाच्या नाशानंतर द्वारका डुबली.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)