बदाम आणि अक्रोडमध्ये असलेले मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि मँगनीज खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. मधातील अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत करू शकतात.
मधामुळे एक्जिमा, सुरकुत्या, पुरळ आणि बारीक रेषा अशा त्वचेच्या समस्या टाळण्यास मदत करू शकते. बदामामधील व्हिटॅमिन ई त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
मध आणि सुका मेवा खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
मध भूक नियंत्रित करण्यास मदत करते तर कोरड्या फळांमध्ये कॅलरीज कमी असतात.
बदाम मधात भिजवून खाल्यास ते पचण्यास सोपे होऊ शकतात.
बदामामध्ये व्हिटॅमिन ई असल्याने स्मरणशक्ती आणि सतर्कता वाढू शकते.
मध आणि बदाम प्रथिने, निरोगी चरबी आणि नैसर्गिक शर्करा यांचे संतुलन तयार करू शकतात, ज्यामुळे जास्त काळ ऊर्जा टिकून राहू शकते.
बदाम आणि एक चमचा मध यातून आपल्याला शरीरासाठी गरजेचे असलेले लोह मिळते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)