प्रत्येकाच्या घरात देवघर असतं. पण या देवघराबद्दल धार्मिक शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावं हे तुम्हाला माहिती आहे का?
देवघरात प्रत्येक गोष्टीची मांडणी अतिशय महत्त्वाची आहे. देवघरात घंटी, उदबत्ती घर आणि पाण्याने भरलेला पात्र हे डावीकडे ठेवावं.
तेलाचा दिवा डावीकडे, आणि तुपाचा दिवा उजवीकडे ठेवला पाहिजे.
देवघरात मूर्तींची, देवांची संख्या ही मर्यादित असावी असे शास्त्र सांगण्यात आलेय.
देवघरात ही स्टीलची घंटा सोडून कुठल्याही धातूची घंटा ठेवावी. तसंच पूजा करताना तुमच्या डाव्या हाताला घंटा ठेवावी.
देवघरात दक्षिणावर्ती शंख वापरावा. तर शंख हा देवघरात तुमच्या हाताचा उजव्या बाजूला ठेवावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)