हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्व असतं. फेब्रुवारीमधील या षट्तिला एकादशी' बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील या एकादशीला भगवान विष्णूंची मनोभावानं पूजाविधी , उपवास केल्यानं कृपा राहते.
पंचांगानुसार यादिवशी व्रत , उपवास केल्यानं घरातील दारिद्र कमी होऊन घरात सुख समृद्धी नांदते.
या दिवशी तीळ वापरल्यानं पुण्य प्राप्ती होऊन मनातील इच्छा देखील पूर्ण होतात.
हे व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते.
षट्तिला एकादशी दिवशी तीळ महत्वाचं मानलं जातं.
अधिकाधिक तिळाचा वापर केल्यानं दीर्घायुष्य प्राप्त होतं.
तीळाच्या सहा प्रकारामुळे ही एकादशी षट्तिला एकादशी म्हणून ओळखली जाते.
षट्तिला एकादशीदिवशी तीळ वापरून स्नान, नैवेद्य, दान, तरपण केलं जात.
तीळ स्नान, तीळ उटणे, तीळ हवन, तीळ तरपण, तीळ भोजन,तीळ दान हे तिळाचे सहा प्रकार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)