आपण रोज सकाळ संध्याकाळ देवघरात, तुळशीजवळ आणि दारात दिव प्रज्विलत करतो. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते असं म्हणतात. पण दिव्यात 3 लवंग ठेवून प्रज्वलित केल्यास काय फायदा मिळतो ते जाणून घेऊयात.
वास्तूशास्त्रानुसार घरातील कोणतेही काम हे वास्तूशास्त्रानुसार केलं पाहिजे. अन्यथा तुम्हाला वास्तू दोषांचा सामना करावा लागू शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार दिव्यासोबत लवंग जाळण्याचे विशेष फायदे जाचकाला मिळतात अशी मान्यता आहे. घराकडे पैसा आकर्षित होतो आणि कुटुंबात प्रगती होते असं म्हणतात.
घरातील नकारात्मक उर्जेच्या प्रवेशामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे दिव्यात लवंग टाकून दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी धनलाभ होण्यासाठी दिव्यात लवंग टाकून लावल्यास फायदा मिळतो.
तुम्हाला कार्यक्षेत्रात यश संपादन करायचं असेल तर दिव्यात लवंग टाकून लावल्यास फायदा होतो. प्रलंबित कामं पूर्ण होण्यास मदत मिळते.
कुंडलीतील शनिची साडेसाती आणि इतर दोष दूर करण्यासाठीही दिव्यात लवंग टाकून लावल्यास शनिदेव प्रसन्न होतात.
घरातील अडचणी दूर करण्यासाठी पूजा करताना आरतीमध्ये कापूर टाकून लवंग जाळल्यास फायदा होता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)