तुळशीजवळ काटेरी रोपटे ठेवल्यास घरात नकारत्मकता पसरते.
तुळशी ही पूजनीय आहे. प्रत्येक घरात सकाळ-संध्याकाळ तुळशीसमोर दिवा लावला जातो, पूजा केली जाते. त्यामुळे तुळशीजवळ झाडू ठेवू नये.
तुळशीजवळ कधीही शिवलिंग ठेवले जात नाही. धार्मिक मान्यतेनुसार, ते अशुभ मानलं जातं.
तुळशीच्या रोपट्याजवळ चुकूनही चप्पल-बूट ठेवू नका. त्यामुळे लक्ष्मी नाराज होते. कायम पैशाची चणचण भासते.
तुम्ही तुळशी वृंदावनाजवळ कचरापेटी ठेवत असाल तर ते त्वरीत उचलून घ्या. अन्यथा घरात दारिद्र्य येते.
धर्मशास्त्रात तुळशीच्या रोपट्याला पवित्र मानलं जातं. मात्र, तुळशी वृंदावनजवळ किंवा तुळशीच्या रोपट्याजवळ काही वस्तू ठेवल्याने महालक्ष्मी नाराज होते.
घराच्या अंगणात तसेच घरात तुळशीचं रोपटं ठेवल्यानं सुख-शांती लाभते, असं म्हटलं जातं. परंतु तुम्हाला माहित आहे का, तुळशी वृंदावनजवळ काही वस्तू ठेवू नयेत.