देवघरात 'या' 3 मूर्ती चुकूनही ठेवू नका!

अन्यथा कोसळणार आर्थिक संकट

पितृपक्ष पंधरवडा 29 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. घरामध्ये पितरांच्या मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नये, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

त्याशिवाय देवघरात 3 मूर्ती चुकूनही ठेवू नका असंही सांगितलं आहे. जर तुम्ही या तुम्ही ठेवल्यास घरावर आर्थिक संकट कोसळू शकतं.

वास्तूनुसार घरात मृत नातेवाईकांचे फोटो देवघरात ठेवू नये. शिवाय त्यांची रोज पूजा करु नयेत. पितृपक्षातच मृत नातेवाईकांची पूजा केली पाहिजे.

त्यासोबतच मृत नातेवाईकांच्या फोटोसोबत साधु संत यांचे फोटो लावू नयेत. असं केल्यास तुम्हाला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

देवघरात काली माता, राहू - केतू आणि शनिदेवाची मूर्ती ठेव नका. या सर्व मूर्ती उग्र मानल्या जातात. यांची पूजा विधी अतिशय कठीण असते. सामान्य माणूस ही पूजा करु शकतं नाही.

वास्तूशास्त्रानुसार देवघरात गणरायाची प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणि नृत्य करणारी मृर्ती ठेवू नयेत. गणरायाची केवळ विराजमान मूर्तीच ठेवा.

देवघरात लक्ष्मीची मूर्ती आवर्जून ठेवा. लक्ष्मी माता ही संपत्तीची देवता मानली जाते. त्यामुळे तिची रोज पूजा केल्यामुळे घरात धन समृद्धी नांदते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story