विमानात कायम डाव्या बाजूनच का प्रवेश दिला जातो?

विमानप्रवास

तुम्ही कधी विमानप्रवास केला असेल तर एक बाब लक्षात आलीच असेल की, विमानात लोक कायम डाव्या बाजूनच प्रवेश करतात.

विमान

खासगी विमान असो किंवा मग पॅसेंजर विमान, सर्वच विमानांमध्ये डाव्या बाजूनं प्रवेश दिला जातो. विमानातील ही व्यवस्था जहाजाच्या संकल्पनेतून मिळाली आहे.

गतकाळातील संकल्पना

गतकाळात बहुतांश व्यापार हा जहाजांच्या मदतीनं होत असे. जहाजाच्या एका बाजूला पोर्ट साईड किंवा 'लेफ्ट साईड' म्हणून संबोधलं जात. दर दुसरी बाजू स्टारबोर्ड अर्थात 'राईट साईड' होती.

उजवी बाजू

उजव्या बाजूला वल्हव आणि इतर काही गोष्टी असल्यामुळं दुसऱ्या बाजूनं प्रवाशांना जहाजात प्रवेश दिला जात असे, हाच बाहेर पडण्याचा मार्गही होता.

दरवाजे

विमानातही हीच प्रणाली वापरण्यात आली. जिथं दोन्ही बाजुंना दरवाजे असूनही डाव्याच बाजुनं प्रवाशांना विमानात प्रवेश दिला जातो आणि तिथूनच त्यांना बाहेरही पाठवलं जातं.

कारण...

उजवीकडील दरवाजे सर्विस डोअर असून, तिथून सामान विमानावर लादलं जातं. विमानाच्या दारांमागे कोणतंही तांत्रिक कारण नसून, ही फक्त पूर्वापार चालत आलेली एक संकल्पना आहे असंच म्हणावं लागेल.

VIEW ALL

Read Next Story