हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. वास्तुशास्त्राच्या अनुषंगानं घरात तुळस असल्यामुळं बऱ्याच समस्या दूर होतात.
तुळशीचं लहानसं रोप घरात भरभराट, आणि सकारात्मकता आणतं.
तुळस घरात असली म्हणजे सर्व झालं, असं नाही. तर, ती योग्य दिशेला असणंही तितकंच महत्त्वाचं.
घरात तुळस कधीच दक्षिण दिशेला ठेवू नये. ही दिशा यम आणि पितरांची आहे.
इथं तुळस ठेवल्यास लक्ष्मी नाराज होते असं म्हणतात. लक्ष्मीच्या अवकृपेमुळे कुटुंबात गरीबी येते.
उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळ ठेवणं केव्हाही उत्तम. ही कुबेराची दिशा आहे.
तुळस ज्या ज्या घरात आहे त्यांनी रविवार आणि एकादशीच्या दिवशी तिला जल अर्पण करु नये.
एकादशी आणि अमावस्येच्या दिवशी तुळचीची पानंही तोडू नका.