Swapna Shastra:आपल्या प्रेमळ व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू दिसणं म्हणजे...; पाहा काय सांगतं स्वप्नशास्त्र

झोपेत सगळ्यांनाच स्वप्नं पडतात. काहींची स्वप्न वाईट असतात, तर काहींची स्वप्न फार छान असतात.

स्वप्न पडणाऱ्यांच्या बाबतीत सांगायचे, तर दिवसभरातल्या अनेक गोष्टी, तसेच काही आठवणीतल्या घटना स्वप्नरूप होऊन मनात घोळतात आणि रात्री स्वप्नात दिसतात.

वाईट स्वप्न पडले तर त्याच त्याच विचारांनी मन अस्वस्थ होते.

त्या स्वप्नांचा अर्थ शोधत आपण शुभ अशुभ घटनांशी संबंध जोडतो. याबाबत स्वप्नशास्त्र काय सांगते ते जाणून घेऊ.

स्वप्नात स्वतःला मृत्यू अवस्थेत पाहणे स्वप्न शास्त्रानुसार असे स्वप्न शुभ मानले जाते. तसे स्वप्न दिसणे म्हणजे आयुष्यातून एखादे मोठे संकट दूर होणार आहे.

एखाद्या कुटुंब सदस्याच्या मृत्यूचे स्वप्न पडणं याबाबत स्वप्न शास्त्र सांगते, असे स्वप्न पडल्यास त्या व्यक्तीचे आयुर्मान वाढते आणि त्यांच्यावर आलेले संकट दूर होते.

स्वप्नात तुम्हाला प्रेतयात्रा दिसली तर ते शुभ लक्षण मानले जाते. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार असल्याचे ते चिन्ह आहे.

पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात, असं म्हटलं जातं. मात्र जेव्हा आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचे स्वप्न पहाटे पाहतो, त्याचा अर्थ केवळ मृत्यू नसून तर ती व्यक्ती मोठ्या संकटात पडणार असल्याचीही ती सूचना असते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story