'या' लोकांनी रुद्राक्ष धारण करु नये

लाभाऐवजी होईल मोठं नुकसान

भगवान शंकरांना रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. जे लोक रुद्राक्ष धारण करतात त्यांच्यावर भगवान शंकराचा विशेष कृपा असते, असं मानलं जातं. पण काही लोकांनी चुकूनही रुद्राक्ष धारण करु नये. या लोकांना लाभाऐवजी मोठं नुकसान होऊ शकतं.

शंकर भगवान यांच्या अश्रूतून रुद्राक्षाचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे. धर्मग्रंथानुसार रुद्राक्षाचे एका मुखापासून ते एकवीस मुखीपर्यंत प्रकार आढळतात. त्यांची वेगवेगळी धारणा आणि नियम आहेत.

असं म्हणतात की, एक मुखी रुद्राक्ष धारण केल्याने नकारात्मक प्रभावपासून आपला बचाव होतो. पण कोणीही रुद्राक्ष धारण करु शकतं नाही.

गर्भवती स्त्री, लहान मुलं रुद्राक्ष धारण करु नये. जर कोणी रुद्राक्ष धारण केलं असेल तर त्याने नवजात बाळाजवळ जाऊ नये.

मांसाहारी शौकीन आणि धूम्रपान करणाऱ्या लोकांनी रुद्राक्ष धारण करु नये.

तर नियमानुसार रात्री झोपतानाही रुद्राक्ष धारण करु नये. शिवाय रुद्राक्ष उशीखाली घेऊन झोपल्यास वाईट स्वप्न पडत नाहीत. तसंच निद्रानाशाची समस्याही दूर होते.

काळ्या धाग्यात रुद्राक्ष धारण करु नये. लाल किंवा पिवळ्या धाग्यात रुद्राक्ष धारण करावे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story