निरोगी व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?

कोलेस्ट्रॉलला सायलेंट किलर मानलं जातं. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. आजारांचा धोका कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं गरजचें असतं. तुम्हाला माहितीये का की हाय कोलेस्ट्रॉलची बॉर्डरलाईन किती आहे?

तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल ही लिपिड प्रोफाइल टेस्टच्या माध्यामातून समजते.

वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL 100 पेक्षा कमी असेल तर कोणतीही अडचण नाही. जर तुम्ही हार्ट पेशंट आहात आणि तुमची कोलेस्ट्रॉल लेवल 100 ते 129 mg/dL असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक आहे.

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा कोणती आरोग्यासंबंधी समस्या नसेल आणि तुमची कोलेस्ट्रॉल लेवल 100 ते 129 mg/dL असेल तर जास्त काळजी करण्याची गरज नाही.

लिपिड टेस्टमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल 130 ते 159 mg/dL असेल तर याला हाय म्हणजेच बॉर्डरलाईन कोलेस्ट्रॉल मानलं जातं.

ज्या व्यक्तींचं कोलेस्ट्रॉल 160 ते 189 mg/dL असेल तर ते हाय आणि धोकादायक या लिस्टमध्ये समाविष्ट होतं.

यापेक्षा जास्त म्हणजे, 190 पेक्षा ज्यांचं कोलेस्ट्रॉल अधिक असतं, त्यांच्या आरोग्यासाठी ही धोक्याची पातळी आहे.

VIEW ALL

Read Next Story