प्रवास, गर्भधारणा, दुग्धजन्य पदार्थांचे अतिसेवन, ताणतणाव आणि आहारात फायबरचे कमी सेवन यामुळे अनेक वेळा या समस्या निर्माण होतात.
गॅस, अॅसिडीटी ही गंभीर समस्या नसली तरी दीर्घकाळ याचा त्रास होत राहिल्यास प्रकृती बिघडू शकते.
जेवणापूर्वी अपचन, गॅस आणि पोटदुखीच्या समस्येपासून सहज सुटका मिळू शकते.
पोटातील गॅस आणि छातीत जळजळ यापासून त्वरित आराम मिळतो.
ओवा हा गॅस, अॅसिडीटीपासून आराम मिळवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो.
लिंबाचा रस अपचन, गॅस आणि हार्ट बर्न यासारख्या समस्यांवर रामबाण उपाय आहे. रोज सकाळी लिंबू पाण्याचे सेवन केल्यास अधिक फायदेशीर ठरेल.
ओवा आणि जीरे पाण्यात मिसळून उकळून घ्यावे. थंड झाल्यावर या पाण्याचे सेवन करावे निश्चित आराम मिळेल.
गॅसची समस्या असेल तर काळी मिरी खावी. यामुळे गॅस आणि अपचनाची समस्या लगेच दूर होते.
काळे मीठ आणि हिंग पावडर पाण्यात मिसळून प्यावे.
जेवणानंतर बडीशेपचे सेवन करावे. गॅस्ट्रिक आणि अॅसिड रिफ्लक्स सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.