कोण आहे शंकराची मुलगी अशोक सुंदरी?

सध्या भगवान शंकराला प्रिय असणारा श्रावण महिना सुरु आहे. दरम्यान, त्यांच्या भक्तांना गणेश आणि कार्तिक या त्यांच्या दोन मुलांबद्दलच माहिती आहे.

अशोक सुंदरीची गोष्ट प्रसिद्ध

भगवान शंकराची एक मुलगीही होती हे फार कमी लोकांना माहिती आहे. अनेक राज्यांमध्ये अशोक सुंदरीची गोष्ट प्रसिद्ध आहे.

पुराणात उल्लेख

पुराणात अशोक सुंदरीच्या गोष्टीचा उल्लेख आहे. एकदा पार्वतीने भगवान शंकराकडे जगातील सर्वात सुंदर बगीचा पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती.

नंदनवात पार्वतीने व्यक्त केली होती इच्छा

त्यामुळे शंकर पार्वतीला नंदनवला घेऊन गेले. तिथे पार्वती एक कल्पवृक्ष फार आवडला. हा आपली इच्छा पूर्ण करणारा वृक्ष आहे.

कल्पवृक्षापासून अशोक सुंदरीचा जन्म

पार्वतीला आपलं एकटेपण दूर करायचं होतं. यामुळे पार्वतीने कल्पवृक्षाकडे एक मुलगी मागितली. तेव्हा कल्पवृक्षापासून अशोक सुंदरीचा जन्म झाला.

शिवलिंगावर अशोक सुंदरीला स्थान

शिवलिंगावर जलाभिषेक केल्यानंतर जेथून पाणी वाहत खाली जातं त्या भागाला अशोक सुंदरी म्हणतात.

पूजेसाठी सोमवार सर्वात चांगला दिवस

अशोक सुंदरीच्या पूजेसाठी सोमवार सर्वात चांगला दिवस आहे. सकाळी आंघोळ केल्यानंतर भगवान शंकर, पार्वती आणि शिवलिंगाची स्थापना करा.

फूल अर्पण करा

यानंतर तुपाचा दिवा लावा आणि फूल अर्पण करा. शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या ठिकाणी फळ, फूल अर्पण करण्यास विसरु नका.

पैसा आणि व्यापाराशी संबंधित अडचणी दूर

भोलेनाथाच्या पूजेप्रमाणे येथेही बेलपत्र वाहण्यास विसरु नका. अशा पूजेने पैसा आणि व्यापाराशी संबंधित अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं.

VIEW ALL

Read Next Story