न्याय आणि कर्मदेवाता सूर्यपूत्र शनिदेवाचा जन्म हा महाष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात झाला. अहमदनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
शिर्डीजवळील शनि शिंगणापूर या ठिकाणी शनिदेवाचा जन्म झाला. हे मंदिर 350 वर्षांहून अधिक जुनं असल्याचा स्थानिकांचं म्हणणं आहे. हे एक जागृत देवस्थान असून इथे महिलांना शनिदेवाच्या दर्शनासाठी बंदी आहे.
हे आगळवेगळं मंदिर असून इथे एक मोठा काळा दगड असून ते भगवान शनिचं रुप मानलं जातं. या मंदिराबद्दल अशी आख्यायिका आहे की, पुरात शनिदेवाची मूर्ती वाहून गेली आणि ती झाडाला अडकली.
ही मूर्ती एका मेंढपाळाला दिसली त्याने ती हलवण्याचा प्रयत्न केला. तर त्यातून रक्तस्त्राव व्हायला लागला. लोक घाबरुन पळून गेली. मग त्या रात्री त्याला स्वप्नात शनिदेवाने दर्शन दिलं.
ही स्वंभू मूर्ती असून तिची दररोज पूजा करा तर गाव सुरक्षित राहील. तेव्हा या गावाला शनिदेवाच्या नावाने शनि शिंगणापूर नावाने ओळखलं जातं.
या गावाची रक्षा खुद्द शनिदेव करतात म्हणून इथे चोरी होत नाही. शनिवार, शनि जयंती, शनि अमावस्याला इथे मोठ्या उत्साह असतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)