शनि 17 जून म्हणजेच आज कुंभ राशीत वक्री अवस्थेत प्रवेश करणार आहे. रात्री 10 वाजून 48 मिनिटांनी शनि उलटी चाल चालणार आहे.
तसं तर शनिची वक्रदृष्टी अजिबात अनुकूल मानली जात नाही. पण काही राशींसाठी मात्र ही स्थिती चांगली असते.
तसंच शनि कुंभ राशीत वक्री करत असल्याने शशराजयोग आणि केंद्रत्रिकोण राजयोग निर्माण होत आहे. शनिच्या वक्रदृष्टीचा नेमका कोणत्या राशीवर काय परिणाम होणार आहे समजून घ्या...
शनिची वक्री स्थिती करिअरला प्रभावित करेल. नोकरीत मेहनत घ्यावी लागेल. आरोग्यात चढ उतार येऊ शकतो. आर्थिक रुपात धनलाभचा योग आहे.
प्रवासात अडथळा येऊ शकतो. कामात धावपळ जास्त असेल. कौटुंबिक आयुष्यात तणाव निर्माण होईल. जोडीदाराशी वाद होऊ शकतात.
मानसिक तणावाला सामोरं जावं लागू शकतं. प्रकृतीच्या समस्या जाणवू शकतात. वादांसंबंधी काळजी घ्या. विद्यार्थिनींना जास्त मेहनत घ्यावी लागेल.
विचार करुन पावलं उचला. गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ नाही. व्यापारात प्रगती होईल
व्यापारी व्यवहारात फायदा होईल. व्यावसायात लाभ होण्याचा योग आहे. वैवाहिक आयुष्यात काही समस्या जाणवू शकतात.
आरोग्याची विशेष काळजी घ्या. जुने आजार बळावू शकतात. खर्चात वाढ होईल. नोकरीच्या निमित्ताने परदेशात जावं लागू शकतं. जुनी कर्जं फेडण्यात यश मिळेल.
प्रेमसंबंधात तणाव येऊ शकतो. गैरसमज वाढू शकतात. आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. बाळासी संबंधित गोड बातमी मिळू शकते.
कुटुंबात अशांती असेल. धन येण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. नात्यात कठीण गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.
महत्वपूर्ण निकाल लागतील. नशिबाची साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. समाजात मान वाढेल, आरोग्य चांगलं राहील.
अनोळखी लोकांपासून सावधान राहा. जीभेवर नियंत्रण टेवा. बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
नशिबाची साथ मिळेल. व्यापारात प्रगतीचा योग असेल. नाती मजबूत होतील. करिअर अधिक लक्ष केंद्रीत करावं लागेल. कौटुंबिक आयुष्यात तणाव निर्माण होईल.
परदेश प्रवासाचा योग निर्माण होईल. खर्चात वाढ होईल. विरोधी तुमच्यावर भारी पडू शकतात. व्यापार सामान्य असेल. विनाकारण खर्चावर नियंत्रण ठेवा.