शनि 17 जूनला उलटी चाल चालणार

शनि 17 जूनला उलटी चाल चालणार आहे. ग्रहांमध्ये शनिची चाल सर्वात धीम्या गतीने सुरु असते. यामुळे त्याला आपलं राशीचक्र पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षं लागतात.

तीन राशींना फायदा

शनि 30 वर्षांनी कुंभ राशीत उलटी चाल करणार आहे. ज्योतीषतज्ज्ञांनुसार, कुंभ राशीत शनि उलटी वाटचाल करणार असल्याने तीन राशींना फायदा होणार आहे.

मिथून

शनि तुमच्या राशीत नवव्या भागात वक्री होणार आहे. नोकरदारांना फायदा होणार आहे. पगारवाढीसह बढती मिळण्याचा योग आहे.

समाजातील प्रतिष्ठा वाढेल

शनिने उलटी वाटचाल सुरु केल्यानंतर कुटुंबासह मोठ्या यात्रेला जाण्याचा योग आहे. समाजातील प्रतिष्ठा वाढेल.

मकर

शनि मकर राशीच्या धन भावात उलटी वाटचाल करणार आहे. तुम्हाला अनपेक्षित ठिकाणांहून धनलाभ होईल. मान, सन्मान वाढेल.

आर्थिक स्थिती सुधारेल

तुमची थांबलेली कामं पूर्ण होतील. व्यावसायात भरभराट होईल तसंच आर्थिक स्थिती सुधारेल.

सिंह

शनि तुमच्या राशीच्या सप्तम भागात वक्री होईल. विवाहित लोकांचं जीवन सुखी असेल. अविवाहित असणाऱ्यांना चांगला जोडीदार मिळू शकतो.