क्रिकेटचा थरार

या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानात एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर एकदिवसीय वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे.

चाहत्यांसाठी खुशखबर

याच पार्श्वभूमीवर क्रिकेट चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. वर्ल्ड कप आणि एशिया कपचे सामने मोफात पाहाता येणार आहेत.

आयपीएलचा सोळावा हंगाम

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सोळावा हंगाम नुकताच संपलाय. धोणीच्या चेन्नई सुपर किंग्सने गुजरातचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.

मोबाईलवर मोफत सामने

आयपीएलचा हा संपूर्ण हंगाम क्रिकेट चाहत्यांना मोबाईलवर मोफत पाहिला मिळाला होता. जिओ सिनेमावर हे सामने पाहाता येत होते.

भारत-पाक सामना

एशिया कप आणि वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान 3 पेक्षा जास्त सामने होण्याची शक्यता आहे.

मोफत पाहाता येणार

भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारे हाय व्होल्टाज सामने मोबाईलवर तुम्ही मोफत पाहू शकणार आहात.

डिस्ने हॉट स्टारची घोषणा

एशिया कप आणि वर्ल्ड कप स्पर्धेचे डिजिटल हक्क डिस्ने हॉट स्टारला मिळाले आहेत. आणि त्यांनी क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

डिस्ने हॉटस्टारवर मोफत प्रक्षेपण

डिस्ने हॉट स्टारने एशिया कप आणि वर्ल्ड कपचे सर्व सामने मोफत दाखवण्याची घोषणा केली आहे.

सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार

पण ज्या चाहत्यांनी Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन घेतलं आहे. त्यांनाच हे सामने मोफत पाहाता येणार आहेत.

कंपनीचा मोठा निर्णय

Disney+ Hotstar च्या चाहत्यांचा अनुभव आणखी समृद्ध करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं कंपनीचे प्रमुख साजिथ शिवनंदन यांनी सांगितलं.

वर्ल्ड रेकॉर्ड

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सदरम्यान IPL 2023 ची फायनल मोबाईलवर तब्बल 3.2 कोटी लोकांनी पाहिली होती. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे