ही आहेत भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे

देशातील प्रसिद्ध मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. पण दर्शनासोबतच भक्त लाखो रुपयांचे सोने आणि अर्पण करून जातात, चला तर मग भारतातील काही श्रीमंत मंदिरांबद्दल जाणून घेऊयात.

पद्मनाभस्वामी मंदिर

हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. या प्राचीन मंदिराची देखभाल त्रावणकोरच्या पूर्वीच्या राजघराण्याने केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पद्मनाभस्वामी मंदिराची एकूण संपत्ती 20 अब्ज अमेरिकन डाॅलर्सपेक्षा अधिक आहे. तर 6 व्हॉल्टमध्ये आहे आणि मंदिराच्या गर्भगृहात भगवान विष्णूची एक मोठी सोन्याची मूर्ती विराजमान आहे.

तिरुपती बालाजी मंदिर

तिरुपती बालाजी मंदिर जे आंध्र प्रदेशात आहे. हे मंदिर भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे मंदिर भगवान व्यंकटेश्वराला समर्पित आहे. ज्याला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंदिराला दरवर्षी 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त देणगी मिळते.

शिर्डी

शिर्डीच्या साईबाबा मंदिराचे वार्षिक उत्पन्न वाढून 900 कोटी रुपये झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंदिरात 380 किलो सोने 4428 किलो चांदी आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्टला गेल्या वर्षी 2022 मध्ये 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या होत्या.

सिद्धिविनायक मंदिर

सिद्धिविनायक मंदिराची ख्यातीही दूरवर पसरली आहे. सिद्धिविनायक मंदिर मुंबईत आहे. या मंदिराला दरवर्षी सुमारे 125 कोटी रुपयांची देणगी मिळते. मंदिरावर 3.7 किलो सोन्याचा कलश आहे.

माता वैष्णो देवी मंदिर

माता वैष्णो देवी मंदिर जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे आहे. हे मंदिर सुमारे 700 वर्षांपूर्वी एका ब्राह्मण पुजाऱ्याने बांधले होते.मंदिर दरवर्षी सुमारे 500 कोटी रुपये कमवते.

गोल्डन टेम्पल

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये गोल्डन टेम्पल हे सहाव्या क्रमांकावर येते. गोल्डन टेम्पल हे शीख धर्मातील सर्वात मोठे गुरुद्वार आहे. हे गुरुद्वार हरविंदर साहब गुरुद्वार या नावाने सुद्धा ओळखले जाते. भारतातील पंजाब राज्य मधील अमृतसर येथे हे मंदिर स्थित आहे.

मीनाक्षी मंदिर

मीनाक्षी मंदिर हे भारताच्या तमिळनाडू राज्यामध्ये स्थित आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये मीनाक्षी मंदिर हे सातव्या क्रमांकावर येते. मीनाक्षी मंदिर हे तमिळनाडूच्या मदुराई या शहरांमध्ये स्थित आहे. दररोज वीस ते तीस हजार भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

जगन्नाथ मंदिर

जगन्नाथ मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये आठव्या क्रमांकावर येते. हिंदू धर्माच्या मानाच्या सर्वात प्रसिद्ध चार 10 धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर हे एक तीर्थक्षेत्र आहे. याबरोबरच अनेक वेळा उत्सवांमध्ये या मंदिरामधील मुर्त्या या 209 किलो सोन्याने साजवल्या जातात. यामुळे या मुर्त्या खूप सुंदर दिसतात. 2010 मध्ये या मंदिराचे बँकेमध्ये 150 करोड रुपये होते.

काशी विश्वनाथ मंदिर

काशी विश्वनाथ मंदिर हे भारताच्या उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये स्थित आहे. काशी विश्वनाथ मंदिराची सुद्धा अनेक वेळा लूट करण्यात आली होती. दर वर्षी या मंदिराच्या दानपेटी मध्ये चार ते पाच करोड रुपये जमा होतात. काशी विश्वनाथ मंदिराची नेटवर्थ ही पाच ते सहा करोड रुपये आहे असे सांगितले जाते.

सोमनाथ मंदिर

सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये दहाव्या क्रमांकावर येते. सोमनाथ मंदिर हे भारताच्या गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. परकिय आक्रमणांनी हे मंदिर सतरा वेळा तोडले आणि लुटले गेले होते परंतु तरीही हे मंदिर आज भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरामध्ये आहे.

VIEW ALL

Read Next Story