Shani Mahadasha

शनी महादशेचे दुष्पपरिणाम टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

न्याय देवता

शनीची महादशा ही कोणाला आर्थिक दुर्बळ बनवते तर कोणाला राजासारखं जीवन देते.

मोहरीच्या तेलाचा गोल दिवा लावा

ज्या व्यक्तीला महादशा, साडेसती किंवा धैयामध्ये शनीच्या अशुभ प्रभावाने त्रास होत असेल, अशा व्यक्तीने शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा गोल दिवा लावावा.

पिंपळाच्या झाडाची पूजा

पिंपळाच्या झाडाभोवती किमान तीन परिक्रमा करावी. प्रदक्षिणा केल्यानंतर शनिदेवाच्या तांत्रिक मंत्राचा 108 वेळा जप करावा. शेवटी नाणी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करावीत.

शं ह्रीं शं शनैश्चराय नमः

तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर शनीच्या या मंत्राचा 11 वेळा जप करा आणि गरिबांना वस्त्र दान करा

ऊँ ऐं ह्रीं श्रीं शनैश्चराय नमः

तुमचे आणि तुमच्या मुलाचे नाते चांगले चालत नसेल तर या मंत्राचा 21 वेळा जप करा

ऊँ श्रीं शं श्रीं शनैश्चराय नमः

कोर्टाच्या कामात अडथळा येत असेल तर या मंत्राचा 31 वेळा जप करा

ऊँ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:

तुमच्या जीवनात कोणत्याही कामात अडथळा येत असेल तर या मंत्राचा 11 वेळा जप करा

ऊँ ऐं शं ह्रीं शनैश्चराय नमः

तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर या मंत्राचा 21 वेळा जप करा

शं ऊँ शं नमः

कार्यालयाशी संबंधित समस्यांसाठी या मंत्राचा 108 वेळा जप करा

ऊँ श्रीं ह्रीं शं शनैश्चराय नमः

आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर या मंत्राचा 11 वेळा जप करा

ऊँ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:

तुम्हाला कोणतेही रखडलेले काम पूर्ण करण्यात अडचण येत असेल तर या मंत्राचा 5 वेळा जप करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story