Shadashtak Yog 2023

मंगळ-शनि युतीमुळे आर्थिक परिस्थितीत भासेल चणचण

May 28,2023

Mangal Shani 2023

या ग्रह संक्रमणांमुळे मंगळ सध्या शनिपासून सहाव्या स्थानावर आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि शनि हे एकमेकांचे शत्रू मानले जातात.


मंगळ आणि शनीच्या सध्याच्या स्थितीमुळे षडाष्टक योग तयार होत आहे, जो अत्यंत अशुभ मानला जातो.


आता मंगळ 30 जून 2023 पर्यंत कर्क राशीत राहील. हा षडाष्टक योग 4 राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे.

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांना अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे या काळात कुठेही गुंतवणूक करणे टाळा. तसेच आरोग्याची काळजी घ्या.

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांना अशुभ परिणाम देईल. अपयशांना सामोरे जावे लागू शकते. ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या समस्या आणि आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी वादापासून दूर राहा. खर्च वाढतील.

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी. गुंतवणूक करू नका. जवळची व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. त्यामुळेच कोणाच्याही चर्चेत एकवेळ पडू नका. शक्यतो प्रवास करणे टाळा.

कुंभ (Aquarius)

षडाष्टक योगामुळे कुंभ राशीच्या लोकांना त्रास होऊ शकतो. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. तब्येतीची काळजी घ्या आणि अडचणी येऊ शकतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story