आपल्या समोर खुद्द रावण आणि त्याची बलाढ्य सेना असतानाही श्रीरामांनी त्याच्यापुढं शरणागती पत्करली नाही. संकटं कितीही येवो त्यांना सामोर जाण्याची तयारी ठेवा हाच संदेश यातून मिळतो.
श्रीराम हे सर्वगुण संपन्न होते, एक कुशल राजा असण्यासोबतच चांगले मित्र, पती, बंधू आणि पुत्रही होते. पण, त्यांनी कधीच अहंकाराचा पगडा जड होऊ दिला नाही.
प्रभू श्रीरामानं आयुष्यात परमानंद, दु:ख, यातना असे सर्व दिवस पाहिले. पण, कधीही त्यांनी स्वत:वरचा संयम सुटू दिला नाही.
कोणत्या गोष्टी किंवा व्यक्तीबाबत पूर्वग्रह बांधू नका हेच प्रभू श्रीराम यांच्या निर्णयांतून पाहायला मिळतं. विभीषणाशी त्यांचं असणारं नातं हेच सांगतं.
मोठ्यांच्या निर्णयावर प्रभूंनी कधीच प्रश्न उपस्थित केला नाही. त्यांनी कायमच एक आदर्श पुत्र म्हणून आपली कर्तव्य बजावली.
प्रभू श्रीराम यांच्या वर्तणुकीतून सर्वांशी समान व्यवहार करण्याची शिकवण मिळते. त्यांनी कायमच सर्वांना प्रेम आणि आदरानं वागवलं. मग तो लहान असो किंवा मोठा...
श्रीराम यांनी कायमच त्यांचे सर्व भक्त आणि मित्रांना महत्त्वं दिलं. याच मित्रांनी संकटकाळी त्यांना मदत केली. त्यामुळं यातून मित्रांना महत्त्वं द्या असाच संदेश मिळतो.