वाई

मुंबईपासून आपण कुठंतरी बरंच दूर जायचं असल्यास तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे वाई. पुरातन मंदिरं, फडणवीस वाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तू, धोम धरण यांसारखी ठिकाणं तिथं तुमच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईपासून रस्ते मार्गानं जायचं झाल्यास तुम्ही चार तासांमध्ये वाईत पोहोचता. इथं खाण्यापिण्याचीही चंगळ, शिवाय बरेच रिसॉर्ट आणि हॉटेल्स राहण्याची उत्तम सोयही देतात. त्यामुळं ठरवा एक ठिकाण आणि थेट निघा.... !

अलिबाग

अलिबागविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी विविध समुद्रकिनाऱ्यांवर तुम्ही निवांत सूर्यास्त पाहू शकता. अलिबागमध्ये मुख्य किनारा वगळता इतरही अनेक किनारे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. इथं तुम्ही रस्ते आणि समुद्र वाहतूक मार्गानं सहजपणे आणि किफायतशीर दरात पोहोचू शकता.

वेळास

शुक्रवार ते रविवार अशी मस्त सुट्टी घेऊन कोकणातील एका सुंदर किनाऱ्याला आणि तिथं सध्या सुरु असणाऱ्या सागरी कासव महोत्सवाला भेट द्यायची ही योग्य वेळ.

कर्नाळा

नवी मुंबईची हद्द सोडत पनवेल मागे टाकलं की पुढे कर्नाळ्याचा घाट लागतो आणि तिथंच येतं कर्नाळा. इथं तुम्ही ट्रेक करण्यासोबतच कर्नाळा पक्षी अभयारण्याचा फेरफटका मारू शकता.

कर्जत

मुंबईपासून साधारण दीड तासांवर असणारं हे ठिकाणं. रेल्वे मार्गानं गेल्यास दीड तास आणि रस्ते मार्गानं गेल्यास तुम्ही दोन तासांत इथं पोहोचू शकता. इथं पावसाळ्याच येण्याची मजा और. पण, एरव्हीसुद्धा इथं असणाऱ्या शांत वातावरणातील रिसॉर्ट्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय.

मुंबईपासून जवळच असणारी पर्यटनस्थळं

कारण, आपण आता मुंबईपासून किमान तीन ते चार तासांच्या अंतरावर असणाऱ्या काही पर्यटनस्थळांविषयी अगदी थोडक्यात माहिती घेणार आहोत.

कुठं जायचं कळेना?

तुम्हीही यापैकीच एक आहात का? शोधून थकलात? कुठं जायचं कळेना? हरकत नाही. पुढची काही सेकंद किंवा काही मिनिटं द्या, सगळं चित्र स्पष्ट होईल.

Weekend Gateways: मुंबईपासून अवघ्या 3- 4 तासांवर असणाऱ्या ऑफबिट ठिकाणांना 'या' वीकेंडला नक्की भेट द्या

VIEW ALL

Read Next Story