पितृ पक्षात न चुकता करा 'या' गोष्टी, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्व आहे. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला याची सुरुवात होते.

आश्विन महिन्याच्या आमावस्येला पितृ पक्ष संपतो.

यावर्षी 29 सप्टेंबरला याची सुरुवात झाली आहे तर 14 ऑक्टोबरला संपेल.

या काळात काही गोष्टी केल्यास देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.

या काळात घरी आलेल्या पाहुण्यांची किंवा गरजूंची मदत केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते.

पितृ पक्षात आपले पूर्वज आपल्या घरात येतात. अशावेळी त्यांची काळजी घ्यायची असते.

या काळात घरी आलेल्या पाहुण्यांना खायला द्यायला हवे, अशाने आपले पूर्वज तृप्त होतात.

पितृ पक्षात दररोज कावळे, कबुतरांना खायला द्या. असे केल्यास घरी सुख-समृद्धी येते.

निर्जन ठिकाणी गाय, कुत्रा, मांजर, कावळ्याला खायला द्या. यामुळे पित्र प्रसन्न होतील.

पितृ पक्षात ब्रम्हचार्याचे पालन करा. या काळात मांसाहार करु नका. जल अर्पण करायला विसरु नका. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story