तुम्हाला फोटोत दोन अभिनेत्री दिसत असतीलच. यावेळी या दोघींमध्ये डाव्या बाजूच्या अभिनेत्रीनं जी फॅशन कॅरी केली आहे त्याकडे सर्वांचेच लक्ष जाते आहे.
या अभिनेत्रीचं नावं आहे डॉली सिंग. डॉली सिंग ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्याचसोबत ती युट्यूबरही आहे. काही दिवसांपुर्वी तिनं कान्स महोत्सवातही हजेरी लावली होती.
यावेळी भूमी पेडणेकर आणि डॉली सिंग या दोघींनी पोझ दिली आहे. यावेळी डॉलीनं लुंगी पॅन्ट त्यावर बेल्ट आणि नेटचा टी व ब्रालेट परिधान केली आहे.
तिच्या या युनिक फॅशनची सध्या जोरात चर्चा आहे त्यावरून तिला ट्रोलही करण्यात आलं आहे.
खरंतर आता फॅशन ही फारच बदलते आहे. त्यातून सध्या युनिसेक्स फॅशनचा जमाना आहे. सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर मुलांची फॅशन वेगळी, मुलींची वेगळी असं काहीच राहिलेलं नाही.
डॉली सिंग ही प्रसिद्ध युट्यूबर आहे. सध्या तिचा Thank You For Coming हा चित्रपट बराच गाजतो आहे.
या चित्रपटावरून बराच वादही निर्माण झाला आहे. परंतु या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे.
हा चित्रपट टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्येही दाखवण्यात आला आहे.