वर्षातील 24 एकादशीपैकी कुठली एकादशी महत्त्वाची आणि मोठी?
Mar 06,2024
वर्षात एकूण 24 एकादशी येत असतात. त्यातील कुठली एकादशी महत्त्वाची आणि शक्तीशाली आहे जाणून घेऊयात.
दर महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाला एकादशी तिथी असते. एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे.
वर्षातील 4 एकादशी या अतिशय महत्त्वाच्या आणि शक्तीशाली मानल्या जातात.
निर्जला एकादशी, अमलकी एकादशी, पापमोचनी एकादशी आणि कार्तिक महिन्यातील देवोत्थान एकादशी ही विशेष आणि महत्त्वाची आहे.
वर्षातील या चार एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्यास अतिशय फलदायी मानली जाते.
त्याशिवाय एकादशीचं व्रत केल्यास पापामुळे मुक्ती मिळतं, असं धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलंय. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)