जर तुम्ही मंदिरात असाल तर कोणाच्या पाया पडू नका आणि कोणाला तुमच्याही पाया पडू देऊ नका. देवाच्या गाभाऱ्यात कोणाच्याही पायाला स्पर्श करु नये.
पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडणंही योग्य नाही. असं केल्याने त्याला पूजेचं फळ मिळत नाही.
स्मशानातून परतलेल्या व्यक्तीच्या पाया पडणं अशुभ मानलं जातं. असं केल्याने तुमचं नुकसान होऊ शकतं.
झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडणं चुकीचं मानलं जातं. कारण झोपलेल्या व्यक्तीच्या पायांना फक्त मृतावस्थेत असताना स्पर्श केला जातो.
कधीही मुलींना पाया पडायला सांगू नका. असं करणं पाप ठरू शकतं.