बेड जवळ कधीच ठेवू नका पाणी! नाही तर होतील 'या' समस्या

बेड जवळ कोणतीही गोष्ट ठेवताना द्या लक्ष

तुम्ही झोपायच्या वेळी कोणत्या वस्तू जवळ ठेवता त्यावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

झोपताना कोणती काळजी घ्याल

रात्री झोपताना पाण्याची बाटली बेडजवळ ठेवण्याची सवय असते. ते असं करतात की त्यांना रात्रीच्या वेळी तहान लागली तर ते सहजपणे तहान भागवू शकतील. या सवयीमुळे विविध समस्या उद्भवू शकतात.

बेडजवळ पाण्याचे भांडे कधीही ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, बेडजवळ पाण्याचे भांडे कधीही ठेवू नये. बेडच्या जवळ पाण्याची बाटली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि मानसिक तणाव आणि इतर समस्या उद्भवू शकतात असे मानले जाते. पाणी चंद्राशी संबंधित आहे आणि हे स्थान सकारात्मक उर्जेच्या प्रवाहात व्यत्यय आणू शकते.

झोपताना कोणत्या गोष्टी जवळ ठेवू नये

झोपताना उशीखाली पुस्तक किंवा पेन ठेवू नका. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि प्रगतीत अडथळा निर्माण होतो.

पुस्तक ठेवल्यानं काय होतं?

पुस्तक जर तुम्ही बेडवर ठेवलत तर वाईट स्वप्ने पडू शकतात आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात.

औषध ठेवू नका

झोपताना , तुमच्या उशीखाली किंवा तुमच्या बेडजवळ औषधे ठेवू नये , कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि आरोग्य समस्या आजारांना कारणीभूत ठरू शकते असे मानले जाते.

(All Photo Credit : Freepik) (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story