मनी प्लांटसह घरामध्ये लावा 'ही' रोपे, पडेल पैशाचा पाऊस

Jun 21,2023

नशीब उजळते

Money Plant Vastu Tips : अनेकदा लोक घरात मनी प्लांट लावतात. वास्तूनुसार मनी प्लांटमुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. तसेच नशीब उजळते आणि धन संपत्तीसह पैसा येतो. घरामध्ये मनी प्लांटसह काही रोपे लावली तर पैशाचा पाऊस पाऊस पडतो.

घरात सुख-समृद्धी

घरात काही झाडे किंवा रोपे लावल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि आर्थिक संकटही दूर होते. मनी प्लांट ही त्यापैकी एक वनस्पती आहे.

मनी प्लांट लावणे शुभ

अनेकदा लोक घरात मनी प्लांट लावतात. वास्तूनुसार मनी प्लांटमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तसेच नशीब उजळते, संपत्ती आणि समृद्धी येते. घरातील वनस्पती म्हणून त्याची लागवड करणे अधिक शुभ मानले जाते.

कोणत्या दिशेला ठेवावे?

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट खोलीच्या आग्नेय कोपर्‍यात ठेवावा. ही दिशा शुक्र आणि गणपतीची मानली जाते. ते दोघेही संपत्ती आणि भाग्याचे प्रतीक आहेत. यामुळे घरात धनसंपत्ती निर्माण होते आणि भाग्य उजळते.

मनी प्लांट कोठे असावे?

घराच्या मुख्य गेटवर मनी प्लांट ठेवणे देखील फायदेशीर आहे. यामुळे घरातील सदस्यांसाठी करिअरचे नवीन मार्ग खुले होतात.

मनी प्लांटसोबत ही रोपे लावा

मनी प्लांटसोबत तुळस, स्पायडर प्लांट किंवा केळीचे झाड लावले तर ते अधिक चांगले मानले जाते. यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.

करिअरमध्ये समृद्धी

ऑफिसमध्ये मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. यामुळे करिअरमध्ये समृद्धी आणि संपत्ती येते.

येथे मनी प्लांट ठेवू नये

वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोणत्याही कोपऱ्यात मनी प्लांट ठेवू नये. घराचे कोपरे चिंता आणि नकारात्मकतेचे स्त्रोत आहेत. मनी प्लांट घराच्या किंवा खोलीच्या पूर्व-पश्चिम दिशेला कधीही ठेवू नये. त्यामुळे घरात आर्थिक समस्या आणि त्रास वाढू लागतात.

समृद्धीचे प्रतीक

वास्तूनुसार, मनी प्लांटची वाढणारी वेली वाढ आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. म्हणूनच वेळोवेळी त्याची छाटणी करा आणि स्वच्छ ठेवा.

VIEW ALL

Read Next Story