उजवा अवयव फडफडणे

पुरुषांमध्ये उजवा अवयव फडफडणे खूप शुभ मानले जाते. मग तो उजवा डोळा असो वा उजवा हात. हे सूचित करते की तुमची ताकद वाढणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

कर्जमुक्ती

कर्जबाजारी झाला आहात आणि अचानक तुम्हाला कर्जमुक्तीचा मार्ग सापडला असेल. तर हे देवाकडून मिळालेले सकारात्मक संकेत आहे. संपत्तीचे वेगवेगळे स्त्रोत असणे हे देखील चांगल संकेत आहे.

स्वप्नात मंत्र ऐकू येणे

जर तुम्ही स्वप्नात राम राम असं मंत्र ऐकलं तर ते खूप चांगलं मानलं जातं. जर ओम मंत्र ऐकला तर सकारात्मक गोष्ट होणार आहे. स्वप्नात मंत्र, घंटा, शंख यांचा आवाज ऐकणे खूप शुभ असतं.

घरात मुलं असणं

मुलांमध्ये देवाचा वास असतो असं मानतात. जर लहान मुलं किंवा बाळ अचानक तुमच्याकडे पाहून हसलं किंवा तुमच्याशी काहीतरी सकारात्मक बोललं. याचा अर्थ तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडणार.

गौमातेचं आगमन

जर गाय तुमच्या घरी रोज येत असेल किंवा तुमच्याकडे अन्नासाठी हंबरत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे. जर तुमच्या घरात पक्षी आणि प्राणी घरटी बनवत असतील तर ते देखील खूप शुभ लक्षण मानले जाते.

अचानक खूश होणे

अनेकदा तुमच्या बाबतीत असे घडू शकते की, तुम्ही विनाकारणाने खूश होता. तेव्हा तुम्ही समजून घ्यावे की देव तुम्हाला काही चांगले संकेत देत आहे.

ब्रम्ह मुहूर्तात झोप उघडणे

जर तुमची झोप ब्रम्हमुहूर्तात म्हणजेच सकाळी 3-5 या कालावधीत उघडत असेल तर तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडणार आहे असे समजा.

तुम्हाला दिसले का 'हे' 7 संकेत?

ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला धनलाभ होणार असतील तर 7 संकेत मिळतात. हे संकेत तुम्हाला दिसले तर तुमचे सुवर्ण दिवस सुरु झाले असं समजा.

VIEW ALL

Read Next Story