तोटे काय?

महिलांना मुलांच्या संगोपनात पतीची मदत मिळत नाही. घरातील सर्व कामे एकट्यानेच करावी लागतात. या प्रकारच्या विवाहात पती-पत्नी दोघांचेही आर्थिकदृष्ट्या मजबूत असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

मुलांचं काय?

जर दोघेही वेगळ्या घरात राहत असतील तर मुले आईकडेच राहतील. नवऱ्याची इच्छा असेल तर तो पत्नीच्या घरी येऊन मुलांसोबत झोपू शकतो.

'हे' निर्णय एकत्र घेतात

ते एकमेकांचा आदर करतात आणि भविष्यातील योजना एकत्रितपणे बनवतात. एकमेकांशी बोलून आर्थिक निर्णय एकत्र घेतले जातात.

वीकेंड किंवा विभक्त विवाह

ही जोडपी त्यांच्या पत्नी किंवा पतीला आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच भेटतात. यामुळे त्यांना लग्नानंतरही स्वातंत्र्याची अनुभूती येते.

जोडप्याचं नातं कसं असतं?

जपानमध्ये विभक्त विवाह करणाऱ्या जोडप्यांमध्ये भावनिक जोड नसते, असेही नाही. अशा जोडप्यांमध्ये, सामान्य विवाहित पती-पत्नीप्रमाणेच संपूर्ण भावनिक संबंध असतो.

Separation marriage म्हणजे काय हो राव?

जपानमध्ये वाढत्या सेपरेशन मॅरेज किंवा वीकेंड मॅरेज अंतर्गत विवाहित जोडपे एकाच घरात राहत असूनही एकाच खोलीत झोपत नाहीत.

'वीकेंड मॅरेज'

विभक्त विवाह, ज्याला जपानमधील काही लोक 'वीकेंड मॅरेज' असंही म्हणतात. भारतीय किंवा इतर काही आशियाई देशांतील लोकांना हा ट्रेंड खूपच विचित्र वाटेल, परंतु जपानमध्ये अशा विवाहांना वेग आला आहे.

कुठे आला आहे हा ट्रेंड?

सध्या आशियाई देश जपानमध्ये लग्नाबाबत 'सेपरेशन मॅरेज'चा नवा ट्रेंड सुरू आहे. जगभरातील कुटुंबपद्धतीत काळानुरूप बदल होत आहेत. याच क्रमाने जपानमध्ये लग्नाचा नवा ट्रेंड.

Separation marriage ट्रेंड

तुम्हाला लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेजच माहिती होतं. पण आता नवीन ट्रेंड आला आहे. सेपरेशन मॅरेज या अनोख्या लग्नाची चर्चा होते आहे.

VIEW ALL

Read Next Story