महाभारतमध्ये एक असा योद्धा होता, जो 24 तासांपैकी फक्त फक्त काही मिनिटं झोप घेयचा. या योद्ध्याने झोपेवर देखील विजय मिळवला होता.
महाभारतामधील हा योद्धा दुसरा तिसरा कोणी नसून अर्जून आहे. युद्ध लढण्यासाठी अर्जुनाने योगनिद्रा सारख्या आध्यात्मिक क्रियेची मदत घेतली होती.
भगवान कृष्णाच्या मदतीने अर्जुनने अज्ञानावर विजय मिळवला होता आणि झोपेवर देखील त्याने नियंत्रण ठेवलं होतं.
अर्जुन श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन होत असत, त्यामुळे तो कृष्णाला एका क्षणासाठी देखील विसरत नसायचा.
झोपेवर विजय मिळवल्याने अर्जुनला गुडाकेश देखील नाव दिलं जातं. गुडाकचा अर्थ झोप होतो, तर ईशचा अर्थ स्वामी.
त्यामुळे गुडाकेशचा अर्थ होतो, झोपेचा स्वामी... ज्याने झोपेवर देखील विजय मिळवलाय, असा अवलिया.
योगनिद्रा हा एक असा अभ्यास आहे, ज्यामध्ये जागे असताना देखील झोप पूर्ण करू शकता. यालाच आध्यात्मिक झोप असंही म्हणतात.