मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम यांनी चौदा वर्षांचा वनवास भोगला होता. अयोध्ये पासून सुरू झालेल्या या प्रवासाची रामेश्वरम त्यानंतर श्रीलंका येथे सांगता झाली.
या वनवासात श्रीराम एकुण 17 ठिकाणी थांबले होते त्यातींल या काही ठिकाणांबद्दल जाणुन घेणार आहोत.
अयोध्येवरुन 20 किलोमीटर अंतरावर तमसा नदी आहे. श्रीरामांनी ही नदी पार करुन वनवासाला सुरुवात केली होती.
प्रयागराजवरुन 20 ते 22 किलोमीटर लांब असलेल्या श्रृंगवेरपुरमध्ये श्रीराम थांबले होते. याच ठिकाणाला सिंगरौर या नावानं ओळखलं जातं.
सिंगरौर मधुन गंगा नदी पार केल्यानंतर श्रीरामांनी या ठिकाणी पहिल्यांदा विश्राम केला होता.
कुरई वरुन निघाल्यावर श्रीराम बंधू लक्ष्मण आणि पत्नी सितेसोबत प्रयागराजला पोहचले होते.
'चित्रकुट' हे असे ठिकाण आहे जिकडे भरत आपले सैन्य घेऊन श्रीरामांची समजूत काढायला आले होते.
गोदावरी काठी असलेल्या अगस्त्य ऋषिंच्या आश्रमात श्रीराम थांबले होते. याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापले होते.