Diwali 2023 : दिवाळीत 'या' 5 राशीच्या लोकांकडे असेल पैसाच पैसा!

दिवाळीला धनाची कारक लक्ष्मी माता आणि गणेशाची पूजा केली जाते. तब्बल 400 वर्षांनंतर दिवाळीला शनि पुष्य नक्षत्रासोबत हर्ष, सरल, शंख, लक्ष्मी, षष, साध्या, मित्र आणि गजकेसरी महायोग जुळून आले आहेत.

मेष (Aries)

या राशीच्या लोकांना दिवाळीचा सण करिअर आणि व्यवसायात प्रगती घेऊन आला आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होणार आहे. तुम्ही आखलेल्या योजनांना यश प्राप्त होणार आहे.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. घर, मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. अडकलेले पैसे परत मिळणार आहे. प्रलंबित कामं लवकर मार्गी लागतील.

तूळ (Libra)

दिवाळी तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ घेऊन आली आहे. वर्षभर संपत्तीची प्राप्त तुम्हाला होणार आहे. आरोग्यही उत्तम राहणार आहे.

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांचे दिवाळीपासून अच्छे दिन सुरु होणार आहे. उत्पन्नाचे स्त्रोतही वाढणार आहे. घरात आनंदाचे वातावरण असणार आहे. मुलांकडून आनंदी बातमी मिळणार आहे.

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. खर्चावर नियंत्रण करु शकणार आहात आणि बचत करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील वाद टळतील. वैवाहिक जीवनातही गोडवा असणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story